आरोग्य उपकेंद्रांना औषधसाठा उपलब्ध करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST2021-05-06T04:32:20+5:302021-05-06T04:32:20+5:30

वाण्याविहीर : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव बघता, गावातील आरोग्य उपकेंद्रांना औषधसाठा उपलब्ध करण्याची मागणी गरजू रूग्णांनी केली आहे. गावातील उपकेंद्रांवर ...

Demand for supply of medicines to health sub-centers | आरोग्य उपकेंद्रांना औषधसाठा उपलब्ध करण्याची मागणी

आरोग्य उपकेंद्रांना औषधसाठा उपलब्ध करण्याची मागणी

वाण्याविहीर : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव बघता, गावातील आरोग्य उपकेंद्रांना औषधसाठा उपलब्ध करण्याची मागणी गरजू रूग्णांनी केली आहे.

गावातील उपकेंद्रांवर खोकला, हातपाय दुखणे, डोके दुखणे, ताप येणे, अशक्तपणा वाटणे, तोंड कडू होणे तसेच मलेरिया, टायफाईडच्या गोळ्या, औषधे गावातील आरोग्य उपकेंद्रांना उपलब्ध झाल्यास रूग्णांना वेळीच औषधोपचार करण्यास सोयीचे होईल. आरोग्य केंद्रात रूग्णांना खोकला, हातपाय दुखणे, अशक्तपणाच्या गोळ्या, औषधे कमी आहेत. आत्ताच संपले, वरून आले नाही, हे वाक्य ऐकून रूग्णांमध्ये संताप निर्माण होत असतो. त्यामुळे ते आरोग्य केंद्रांमध्ये जाण्यासाठी दुर्लक्ष करत असतात तरी कोरोनाचा प्रादुर्भाव बघता व खासगी रूग्णालयात अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने गावातील आरोग्य उपकेंद्रांना कोरोनासह मलेरिया, टायफाईडचा आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्याची मागणी रूग्णांनी केली आहे.

Web Title: Demand for supply of medicines to health sub-centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.