उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याची मागणी, दिव्यांग संघटनेचेे तहसीलदांराना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST2021-01-18T04:29:01+5:302021-01-18T04:29:01+5:30
तळोदा : शहरातील विविध भागात उघड्यावर मांसविक्री सुरू असून, त्यामुळे या परिसरात रोगराई पसरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह लहान ...

उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याची मागणी, दिव्यांग संघटनेचेे तहसीलदांराना निवेदन
तळोदा : शहरातील विविध भागात उघड्यावर मांसविक्री सुरू असून, त्यामुळे या परिसरात रोगराई पसरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह लहान मुले आजारी पडत असल्याने उघड्यावरील मांसविक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी तालुका दिव्यांग संघटनेने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. शहरातील अनेक भागात उघड्यावरील मांसविक्रीने रोगराई पसरण्याचा गंभीर धोका असल्याने शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. राज्यातील अनेक जिल्हांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव होत असल्याने अशा परिस्थितीत उघड्यावरील मांस विक्रीमुळे धोका वाढून आजारांना निमत्रंण मिळत आहे. शहरात पालिका प्रशासनाने व तहसीलदारांनी उघड्यावरील मांसविक्रीला आळा घालावा, या मागणीचे निवेदन तालुका दिव्यांग संघटनेचे मंगलचंद जैन यांनी तहसीलदार गिरीश वखारे यांना दिले. यावेळी संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.