दुर्गम भागात बसेस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST2021-06-06T04:23:17+5:302021-06-06T04:23:17+5:30

धडगाव : शहादा व नंदूरबार आगाराने धडगाव आणि मोलगी परिसरात बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी आहे. १ जूनपासून जिल्ह्यात बसेस ...

Demand to start buses in remote areas | दुर्गम भागात बसेस सुरू करण्याची मागणी

दुर्गम भागात बसेस सुरू करण्याची मागणी

धडगाव : शहादा व नंदूरबार आगाराने धडगाव आणि मोलगी परिसरात बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी आहे. १ जूनपासून जिल्ह्यात बसेस सुुरू झाल्या आहेत. याअंतर्गत धडगाव व मोलगी परिसरात बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

टाकलीपाडा येथे लसीकरण शिबिर

नंदूरबार : नवापूर तालुक्यातील टाकलीपाडा येथे झालेल्या लसीकरण शिबिरात २४५ जणांचे लसीकरण करण्यात आले. गावातील देवल्या धनजी गावीत यांनी प्रथम लस घेतली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद गावीत, सदस्य दिनेश गावीत, इनेश गावीत यांच्यासह केंद्रप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आदी उपस्थित होते.

वाका ते नंदूरबारदरम्यान अवैध वृक्षतोड

नंदूरबार : गुजरात राज्यातील वाका चाररस्ता ते नंदूरबारदरम्यान बेकायदेशीर वृक्षतोड पुन्हा सुरू झाली आहे. मार्गाच्या दुतर्फा असलेल्या मोठ्या झाडांना खालील बाजूस आग लावून वृक्षतोडीचा हा प्रकार आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Demand to start buses in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.