बोरद व वाडी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:52+5:302021-02-05T08:11:52+5:30
वैजाली परिसरातील व सातपुडा पर्वत भागातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी नोकरवर्ग, विद्यार्थी यांचा जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त दररोज संपर्क येतो. याअगोदर ...

बोरद व वाडी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी
वैजाली परिसरातील व सातपुडा पर्वत भागातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी नोकरवर्ग, विद्यार्थी यांचा जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त दररोज संपर्क येतो. याअगोदर या भागातून नंदुरबार-बोरद व नंदुरबार-वाडी या बसेस दररोज दिवसातून तीन ते चारवेळा फेऱ्या मारत होत्या. मात्र कोरोना महामारीमुळे या बसफेऱ्या पूर्णत: बंद करण्यात आल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी पाहता सर्वत्र सुरळीत वातावरण असून, ठिकठिकाणी बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नंदुरबार आगार प्रमुखांनी नंदुरबार येथून प्रकाशा, वैजालीमार्गे बोरद व वाडी या बसेसच्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस विजय पाटील व कार्यकर्त्यांनी नंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.