बोरद येथील रोजगार सेवक बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:10+5:302021-05-28T04:23:10+5:30

निवेदनात, बोरद येथील रोजगार सेवक धनराज पाडवी हा मनमानी करीत असून घरकुल लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करीत असतो. इंदिरा ...

Demand for replacement of employment servant at Borad | बोरद येथील रोजगार सेवक बदलण्याची मागणी

बोरद येथील रोजगार सेवक बदलण्याची मागणी

निवेदनात, बोरद येथील रोजगार सेवक धनराज पाडवी हा मनमानी करीत असून घरकुल लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करीत असतो. इंदिरा आवास योजना, रमाई योजनेंतर्गत घरकुल व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गावात घरकुल मंजूर झाले आहेत. प्रत्येक लाभार्थ्याकडून दोन ते तीन हजाराची मागणी करतो. जो पैसे देत नाही त्याचे काम करीत नाही, पैसे देऊनही चार-पाच महिन्यापर्यंत पंचायत समितीत कागदपत्रे जमा करीत नाही. तसेच रोजगार हमीचे मस्टर वेळेवर काढत नाही, घरकुल लाभार्थ्यांसोबत अरेरावी करीत असल्याने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संबधित रोजगार सेवकाच्या जागेवर दुसरा सेवक नेमावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर काळू ताराचंद मोरे, धारासिंग नवशा पवार, आशाबाई ब्रिजलाल, नवरंग मनिलाल धुण्या डोमे, प्रताप सन्या ठाकरे, आमशा नवशा ठाकरे, बदाम बुध्या पवार आदी लाभार्थ्यांच्या सह्या आहेत.

Web Title: Demand for replacement of employment servant at Borad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.