कुंडी ते होराफळी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST2021-09-10T04:37:03+5:302021-09-10T04:37:03+5:30

तसेच या मार्गावर आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत व संरक्षण कठडे नाहीत. तसेच काही ठिकाणी रस्त्याचा भाग खचला असल्याने रात्रीच्या ...

Demand for repair of Kundi to Horafali road | कुंडी ते होराफळी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

कुंडी ते होराफळी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

तसेच या मार्गावर आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत व संरक्षण कठडे नाहीत. तसेच काही ठिकाणी रस्त्याचा भाग खचला असल्याने रात्रीच्या वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

कुंडी-होराफळी रस्त्यावरून होराफळीसह तीनखुन्या, मोरखी, मालीआंबापाडा, तोबीकुवा, ठाणा, खडकापाणी, डोटकीपाडा, कोटवाईपाडा, दहेल, वालंब, चिखली, कोठली, कोकटी, उमरूफळी तसेच तीनखुन्या, कुवरखडी देवमोगराकडे जाणारा गुजरात मार्ग मिळत असल्याने व होराफळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात, शासकीय आश्रमशाळा असल्याने या रस्त्यावरूनच अक्कलकुवा व नंदुरबार गाठावे लागत असताना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मोरंबा, कुंडी होराफळी रस्त्याची त्वरित दुरूस्ती करणे गरजेचे आहे.

Web Title: Demand for repair of Kundi to Horafali road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.