नवापूरच्या वंचित लाभाथ्र्याना घरकुल देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:42 IST2019-11-27T11:42:16+5:302019-11-27T11:42:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : पंतप्रधान आवास योजनेच्या व्हर्टिकल तीन योजनेतील 622 वंचित लाभाथ्र्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, ...

नवापूरच्या वंचित लाभाथ्र्याना घरकुल देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : पंतप्रधान आवास योजनेच्या व्हर्टिकल तीन योजनेतील 622 वंचित लाभाथ्र्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच नवापूर नगरपालिकेतर्फे घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
माजी तालुकाप्रमुख गणेश वडनेरे यांनी केली आहे. त्यांनी तहसीलदार सुनीता ज:हाड यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत व्हर्टिकल तीन या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नवापूर शहरातून जवळपास 622 बेघर कुटुंबांनी 2016 पासून अर्ज केले आहे. शहरातून वाहणा:या रंगावली नदीला 17 ऑगस्ट 2018 रोजी आलेल्या महापुरामुळे नदीकाठी राहणा:या अनेकांचे नुकसान झाले होते. शहरातील बेलदारवाडा, ताईवाडा, जुने महादेव मंदिर परिसर, भगतवाडी, राजीवनगर, ईदगाह रोड, फुलफळी, जुनी पोस्ट गल्ली भागातील रहिवासीयांना सर्वाधिक फटका बसला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी नुकसानची पाहणी करून पूरग्रस्त भागातील बाधितांना पंतप्रधान आवास योजनेत घरकुल देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले होते. तसेच 27 ऑगस्ट 2018 रोजी तत्कालीन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पूरग्रस्तांना घरकुल देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रश्न तातडीने सोडवत पात्र लाभाथ्र्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा गणेश वडनेरे, दिनेश भोई, किसन शिरसाठ, हार्दिक माळी आदींनी दिला आहे.