जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:56+5:302021-08-23T04:32:56+5:30
निवेदनात, जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून सेवा दिली जात आहे. परंतु सर्वच ठिकाणी अपूर्ण कर्मचारी व सुविधांचा अभाव असल्यामुळे गुणात्मक ...

जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी
निवेदनात, जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून सेवा दिली जात आहे. परंतु सर्वच ठिकाणी अपूर्ण कर्मचारी व सुविधांचा अभाव असल्यामुळे गुणात्मक दर्जाची आरोग्यसेवा जनतेला मिळत नाही. जिल्ह्यातील आरोग्य विभागात हजारोंच्या संख्येने अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागा रिक्त असून पेसा क्षेत्रातील सरकारी दवाखान्यात पेसा कायद्यानुसार आदिवासींच्या रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात. जिल्ह्यातील आरोग्य सेवा संस्थांचे इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅण्डर्डच्या गाईडलाईन च्या अनुषंगाने सर्वेक्षण करावे व सर्व शाळांचा अहवाल जनतेच्या माहितीकरता प्रसारित करावा. तसेच त्यातील त्रुटी कर्मचारी व सुविधांचा अभाव तत्काळ दूर करून भारत सरकारच्या इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅण्डर्ड मध्ये नमूद केलेल्या गाईड लाईननुसार जनतेला आरोग्यसेवा पुरवण्यात यावी, अशी मागणी केटी गावीत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.