सायबर कॅफे चालकाकडे खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:49 IST2019-09-06T12:49:29+5:302019-09-06T12:49:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सायबर कॅफे चालकाकडून 50 हजाराची खंडणी मागणा:या एकासह त्याच्यासोबत असलेल्या महिलांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात ...

सायबर कॅफे चालकाकडे खंडणीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सायबर कॅफे चालकाकडून 50 हजाराची खंडणी मागणा:या एकासह त्याच्यासोबत असलेल्या महिलांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 रोजी रात्री दहा वाजता बसस्थानक आवारात ही घटना घडली होती.
राजेश परशुराम ठाकरे, रा.चिंचपाडा भिलाटी असे मुख्य संशयीताचे नाव असून त्याच्यासोबत इतर महिला देखील होत्या. सायबर कॅफे चालक कपिल रामकृष्ण चौधरी हे 3 रोजी रात्री दहा वाजता बसस्थानक आवारात उभे असतांना त्यांना राजेश परशुराम ठाकरे हे भेटले. त्यांनी 50 हजाराची मागणी केली.
पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करेल. महिलांना सायबर कॅफेवर पाठवून स्वत:चे कपडे फाडून विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल दाखल करीन अशी धमकी दिली. यामुळे घाबरून जावून दुस:या दिवशी अर्थात 4 रोजी रात्री 11 वाजता कपिल चौधरी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून राजेश ठाकरे सह त्याच्या सोबत असलेल्या महिला व इतरांविरुद्ध खंडणीची मागणी आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पी.पी.सोनवणे करीत आहे.