नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:14 IST2019-11-02T13:14:40+5:302019-11-02T13:14:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक:यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार ...

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक:यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी कजर्बाजारी होण्याची वेळ आली आहे. शहादा व तळोदा तालुक्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका, कापूस या पिकांसह नगदी पीक असलेल्या उसाचेही नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतक:यांना आर्थिक हातभार लावणे गरजेचे आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासकीय अधिका:यांना द्यावेत व नुकसानग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ देण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी निवेदनात केली आहे.