सातपुड्यातील घाटसेक्शन रस्त्यावर संरक्षण भिंती व कठड्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:15+5:302021-03-08T04:29:15+5:30
डेब्रामाळ ते आबांवाईपाडा या दरम्यान अडीच किलोमीटरचा रस्ता नसल्याने आबांवाईपाडा व बुदेमालपाडा येथील नागरिकांना अडीच किलोमीटर पायपीट करून यावे ...

सातपुड्यातील घाटसेक्शन रस्त्यावर संरक्षण भिंती व कठड्यांची मागणी
डेब्रामाळ ते आबांवाईपाडा या दरम्यान अडीच किलोमीटरचा रस्ता नसल्याने आबांवाईपाडा व बुदेमालपाडा येथील नागरिकांना अडीच किलोमीटर पायपीट करून यावे लागत आहे. कुडीडोगरपाडा, हेल्टाईपाडा,बालाजापाडा येथील नागरिकांना पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. डनेलच्या सुरवाणीपाडा येथील नागरीकांना तीन किलोमीटर खडतर चढउतार च्या डोंगर माथ्याच्या पायवाटेने मांडव्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी यावे लागते.
साबंर पलासखोब्रा ते बुदेमालपाडा, आणि पलासखोब्रा ते मिठी बिनीपाडा या रस्त्यावर खडी टाकण्यात आली. मात्र खडीकरण व डांबरीकरण झाले नसल्याने त्रासदायक झाले आहे. तरी या रस्त्यांवर खडीकरण व डांबरीकरणाची मागणी या परिसरातील वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. घाट सेक्शनमधील रस्त्यावर संरक्षण भिंती निर्माण करण्याची गरज आहे.
या भागातील रस्ते वरील चढाव कमी न केल्याने वळणावर पुरेशी जागा तयार करण्यात आले नसल्याने मोठ्या वाहनांचा वळण बसत नाही. त्यामुळे या भागात एसटी बस येऊ शकत नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांना बसअभावी मोलगी येथे शिक्षण घेण्याकरिता जाण्यासाठी गैरसोयीचे होत आहे
-रामसिग वळवी,कंजाला