शहादा शहरात जंतूनाशक फवारणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST2021-05-05T04:50:11+5:302021-05-05T04:50:11+5:30

निवेदनात म्हटले आहे की, शहादा शहर तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. अशा परिस्थितीत उपाययोजना ...

Demand for pesticide spraying in Shahada city | शहादा शहरात जंतूनाशक फवारणी करण्याची मागणी

शहादा शहरात जंतूनाशक फवारणी करण्याची मागणी

निवेदनात म्हटले आहे की, शहादा शहर तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. अशा परिस्थितीत उपाययोजना म्हणून जंतुनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे. कोरोना हा आजार दिवसेंदिवस अधिक घट्ट होत. अनेक कुटुंबांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे दिसत असून या संसर्गजन्य आजारापासून फैलाव कमी व्हावा तसेच शहरात आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने जंतुनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे. मागील वर्षापेक्षा यावेळी कोरोना आजारामुळे अनेकांनी आपले प्राण गमविले आहेत. मृत नागरिकांवर अंत्यसंस्कारासाठी शहरात एकमेव स्मशानभूमी आहे. यामुळे नातेवाइकांना मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तासन्‌तास थांबावे लागत आहे. पालिका प्रशासनाने स्मशानभूमीवरील ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त स्मशानभूमीची उभारणी करून कार्यान्वित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Demand for pesticide spraying in Shahada city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.