बॅण्ड वादकांनाही परवाणगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:29 IST2020-06-25T12:29:05+5:302020-06-25T12:29:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बॅण्ड वादकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर बाबींना दिलेल्या सवलतींप्रमाणे बॅण्ड ...

Demand for permission for band players too | बॅण्ड वादकांनाही परवाणगी देण्याची मागणी

बॅण्ड वादकांनाही परवाणगी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बॅण्ड वादकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर बाबींना दिलेल्या सवलतींप्रमाणे बॅण्ड वादकांनाही किमान संख्येत सवलत मिळावी व त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुरू करावे अशी मागणी जिल्हा असोसिएशनने केली आहे.
नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणीसह वाद्य परवानगीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात स्मरण पत्र देऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटना पुणे संचलित नंदुरबार जिल्हा बँड युनियनचे जिल्हाध्यक्ष सुनिल पवार व पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे सर्वत्र अर्थ व्यवस्था पूर्णपणे बंद पडलेली आहे. यामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. याचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते जुलै महिन्यात लग्नसमारंभासह इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर असल्याने वर्षभराचा हाच महत्त्वाचा हंगाम असतो. या माध्यमातूनच बँड पथकातील कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. या काळात शासनाच्या सूचनेनुसार व्यवसाय बंद पडल्याने बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सद्यपरिस्थितीत बँड कलावंतांना नियमांच्या अधीन राहून १० कलाकारांना वाद्य वाजविण्याची परवानगी मिळावी तसेच शासनातर्फे बँड कलावंतांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यापूर्वी नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे २६ मे रोजी देखील जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर २४ जून रोजी पुन्हा स्मरण पत्र देण्यात आले.
या निवेदनावर नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुनिल पवार, जिल्हा उपाध्यक्ष अमित डामरे, तालुकाध्यक्ष प्रमेश वसावे, अजय गावित, निजाम वळवी, किशोर वळवी, रवींद्र गावित तसेच नंदुरबार शहराध्यक्ष सागर सोनवणे या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

ेगेल्या काही वर्षापासून डीजेमुळे बॅण्ड वादकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता त्यात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे किमान वाद्य वाजविणाºयांची अट कायम ठेवत परवाणगी दिली तर व्यवसायाला उभारी येऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Demand for permission for band players too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.