विसरवाडी गावासाठी कायमस्वरुपी रुग्णवाहिकेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST2021-04-12T04:28:21+5:302021-04-12T04:28:21+5:30

नवापूर तालुक्यातील विसरवाडी हे मोठे बाजारपेठ असलेले गाव असून विसरवाडी गावालगत ५० ते ५५ गावांचा संपर्क येतो व तेथील ...

Demand for permanent ambulance for Visarwadi village | विसरवाडी गावासाठी कायमस्वरुपी रुग्णवाहिकेची मागणी

विसरवाडी गावासाठी कायमस्वरुपी रुग्णवाहिकेची मागणी

नवापूर तालुक्यातील विसरवाडी हे मोठे बाजारपेठ असलेले गाव असून विसरवाडी गावालगत ५० ते ५५ गावांचा संपर्क येतो व तेथील नागरिक येथे दवाखान्यात उपचारासाठी येतात. हे गाव सुरत-नागपूर महामार्गावर असल्याने वारंवार अपघात होतात. अशावेळी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. तसेच सध्या कोरोनाचा प्रसार वाढला असून पेशंटला अन्यत्र उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिका लवकर उपलब्ध होत नाही. १०८ नंबरवर फोन लावला असता पाच ते सहा तास वेळ लागतो, कधीतर रुग्णवाहिका येतही नाही. वरील गंभीर बाब लक्षात घेता आपल्या अधिकारात एक रुग्णवाहिका दिली तर विसरवाडी व परिसरातील रुग्णांना लाभ होईल व रुग्णांचे प्राणही वाचतील. म्हणून कायमस्वरूपी किमान एक तरी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सरपंच बकाराम गावीत यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे दिली आहे.

Web Title: Demand for permanent ambulance for Visarwadi village