शेतकरी संघातर्फे एक हजार टन खताची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:21 IST2020-07-08T12:21:24+5:302020-07-08T12:21:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतकरी सहकारी संघाच्या तालुक्यातील सहा सेंटरमधून युरिया खताचे वितरण सुरू आहे. खताची खरेदी करण्यासाठी ...

शेतकरी संघातर्फे एक हजार टन खताची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतकरी सहकारी संघाच्या तालुक्यातील सहा सेंटरमधून युरिया खताचे वितरण सुरू आहे. खताची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी सकाळपासूनच गर्दी करीत आहेत. संघाच्यावतीने एक हजार ते एक हजार २०० टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली असून, शासनाने वेळेवर पुरवठा करावा अशी मागणी अध्यक्ष बी.के पाटील यांनी केली आहे.
सध्या सर्वत्र शेतशिवारामध्ये खरीप हंगामाची तयारी करताना शेतकरी, शेतमजुरांची लगबग दिसून येत आहे. पिकांची पेरणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. जवळपास तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्याचे चित्र आहे. थोड्याफार प्रमाणावर पेरण्या अजूनही बाकी आहेत. जून महिना लोटला असला तरीही अद्यापपर्यंत म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. मागील १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले होते.
परंतु आता बळीराजाला आशा आहे, ती फक्त दमदार पर्जन्यवृष्टीची. जून महिन्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे या महिन्यात तरी दमदार पर्जन्यवृष्टी व्हावी अशी शेतकºयांना आशा लागून राहिलेली आहे. शेजारच्या धुळे, जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातही दमदार पाऊस बरसावा यासाठी बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
गेल्या १० ते १५ दिवसांपूर्वी तालुक्यात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी १५ ते २० मिनिटे चांगल्या पावसानंतर वरूणराजाने विश्रांती घेतली. मंगळवारी ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेती साहित्य खरेदी करीत असल्याचे दिसून आले. शेतात पेरणी झाली असल्याने खतांच्या दुकानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. अनेक कृषी केंद्रांवर खत खरेदीसाठी शेतकºयांना रांगा लावल्या होत्या.
शहरातील परदेशीपुरा भागात असलेल्या शेतकरी सहकारी संघाकडून सध्या युरियाचे वाटप करण्यात येत आहे. या ठिकाणी सकाळपासूनच शेतकरी व शेतमजुरांची खत घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास महिलांची लक्षणीय गर्दी उसळली होती. शेतकरी सहकारी संघाच्या नंदुरबार, रनाळे, कोपर्ली, खोंडामळी, ईसाईनगर या शेतकरी सहकारी संघाच्या सहा युनिटमधून युरियाचे वाटप करण्यात येत आहे.
शेतकरी सहकरी संघाच्या सहा युनीट मधून शेतकºयांना युरिया व मिश्र खतांचे वाटप करण्यात येत आहे. सध्या ४०० टन युरिया साठा उपलब्ध झाला आहे. दररोज शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच शेतकºयांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच खतांचा पुरवठा करण्यात येत असतो. येणाºया प्रत्येक शेतकºयाला युरिया खताच्या पाच पिशव्यांचे वाटप करण्यात येत आहे. रनाळे सेंटर येथे शेतकºयांची जास्त गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी दोनच पिशव्यांचे वाटप सुरू आहे. येणाºया कालावधीत समाधानकारक पाऊस झाल्यानंतर खतांची मागणी वाढणार आहे. त्यासाठी शेतकरी सहकारी संघाकडून एक हजार ते एक हजार २०० टन खतांची मागणी करण्यात येणार असून, शासनाने वेळेवर पुरवठा करावा, अशी अपेक्षा शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील यांनी केली.