अतिवृष्टीतील नुकसानधारक शेतकऱ्यांना मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:51 AM2019-12-11T11:51:45+5:302019-12-11T11:51:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई व पीक विम्याच्या भरपाईची रक्कम ...

Demand for help to farmers affected by heavy rainfall | अतिवृष्टीतील नुकसानधारक शेतकऱ्यांना मदतीची मागणी

अतिवृष्टीतील नुकसानधारक शेतकऱ्यांना मदतीची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई व पीक विम्याच्या भरपाईची रक्कम देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अल्पभुधारक शेतकरी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे उन्मळून पडला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आर्थिक मंदिचे संकट उभे आहे. ज्याचे मुख्य कारण ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून राज्यात पडलेला सततच्या दुष्काळाने आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी अधिक त्रस्त झालेला आहे. खर्च भागविण्यासाठी शेतकºयांची प्रचंड तारेवरची कसरत सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे चुकीचे पाऊल उचलतो. शिवसेना सत्तेत असतांना अथवा नसतानाही शेतकºयांच्या सोबत राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने २५ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रभर शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी, पीक विमा योजनेची रक्कम मिळावी या करीता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक आचारसहिंता लागू असल्याने मोर्चा रद्द करून केवळ पदाधिकाºयांसह निवेदन देवून आमच्या भावना आपण राज्यपाल व शासनापर्यंत पोहोचवाव्यात.
या वेळी शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळावी व ज्यांना रक्कम मिळालेल्या आहेत अशा शेतकºयांच्या नावाच्या याद्या त्वरीत जाहीर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शहादा तालुक्यात ओला दुष्काळाने बाधीत झालेल्या शेतकºयांना राज्यपालांनी जाहीर केलेली शासकीय मदत त्वरीत खात्यात जमा करावी व मदत मिळालेल्या शेतकºयांच्या याद्या जाहीर कराव्यात. घर, शेती, जनावरे, विहीरी इत्यादींच्या नुकसानीची माहिती पंचनाम्यात समाविष्ठ करून भरपाई मिळावी. पीक कर्ज उद्दीष्ट पूर्ण झाले की, कसे याची खातर जमा करून कार्यवाही करावी. शासकीय योजनेप्रमाणे कर्ज मुक्तीत लाभ झालेल्या व प्रतिक्षा यादीवर असलेल्या शेतकºयांची यादी जाहीर करावी. तरी वरील बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकºयांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली असून, या निवेदनावर तालुकाप्रमुख मधुकर रोहिदास मिस्तरी, शहर प्रमुख तुषार पाटील, भगवान टिला अलकरी, गणेश चित्रकथे, सुभाष पाटील, उत्तम पाटील, डॉ.सागर पाटील, रमेश कुवर, उद्धव पाटील, यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, शिवसेना पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Demand for help to farmers affected by heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.