सुंदर बायकोसाठी नरबळीची मागणी करणा:या तांत्रिकासह दोघांना नंदुरबारात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:21 IST2018-09-27T12:21:46+5:302018-09-27T12:21:55+5:30

सुंदर बायकोसाठी नरबळीची मागणी करणा:या तांत्रिकासह दोघांना नंदुरबारात अटक
नंदुरबार : धनप्राप्तीसह सुंदर बायको मिळावी व इतर लाभ करून देण्याच्या बहाण्याने नर बळीची मागणी करणा:या तांत्रिक बाबासह त्याला पुजेसाठी आणणा:यास पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
नंदुरबारातील बाबा गणपतीच्या मागे राहणारे अमोल प्रवीण सोनार यांच्या घरात हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला. पोलिसांनी अमोल सोनार याच्यासह कथीत तांत्रिक बाबा सुरुपसिंग महाराज, रा.ढेकवद याला अटक केली आहे. परेश राजेंद्र सोनार यांच्या फिर्यादीनुसार, अमोल सोनार आणखी दोघांनी त्याला पुजेच्या ठिकाणी नेले. तेथे तांत्रिक बाबाने विवस्त्र अवस्थेत पुजा केली. मंतरलेले पाणी पिण्यास दिले. त्यानंतर धनप्राप्ती व इतर लाभासाठी यापुढच्या पुजेत नरबळी द्यावी लागेल असे सांगितले. परेश सोनार घाबरलेल्या अवस्थेत तेथून निघाले व घरी हा प्रकार सांगितला. त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरिक्षक गिरीश पाटील यांना हकीकत सांगितली. त्यांनी अमोल सोनार यांच्याकडून फिर्याद घेवून तांत्रिक बाबा सुरुपसिंग महाराज व अमोल सोनार याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक व समुळ उच्चाटन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक करून तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.