शाडूमातीच्या गणेश मूर्तींना यंदा मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:48 IST2020-08-03T12:47:56+5:302020-08-03T12:48:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गणेशमूर्र्तींची उंची चार फूट मर्यादीत राहणार आहे. त्यामुळे एक ते चार ...

शाडूमातीच्या गणेश मूर्तींना यंदा मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गणेशमूर्र्तींची उंची चार फूट मर्यादीत राहणार आहे. त्यामुळे एक ते चार फुटाच्या शाडू मातीच्या मूर्र्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
गेल्या आठवड्यापासून मूर्ती कारागिरांकडे विशेषत: शाडूमातीच्या मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांकडे मागणी वाढली आहे. काहींनी बुकींग केली आहे तर काहींनी किरकोळ विक्रीसाठी मूर्र्तींची मागणी करून ठेवली आहे. नंदुरबारात लहान मूर्ती बनविण्याचा घरगुती उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यात आता शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचा घरगुती व्यवसाय देखील वाढला आहे. त्यामुळे या काळात अशा कुटूंबांना चांगला रोजगार मिळत असतो.