नर्सेस व डॉक्टरांना आरोग्यसेवेत सामावून घेण्याची आरोग्य कर्मचारी महासंघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:48+5:302021-06-16T04:40:48+5:30
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. निवेदनात, जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे ...

नर्सेस व डॉक्टरांना आरोग्यसेवेत सामावून घेण्याची आरोग्य कर्मचारी महासंघाची मागणी
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. निवेदनात, जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत होता. यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागात तातडीने २०० अधिपरीचारिका, परिचारिका, परिचर व वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली. खाजगी ठिकाणी सुरु असलेली नोकरी सोडून अनेक परिचारिका याठिकाणी दाखल झाल्या होत्या. सातत्याने काम करणा-या या कर्मचा-यांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतू कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर या कर्मचा-यांना कामावरुन काढून टाकण्याचा प्रकार होत आहे. यातून या सर्वांना कोरोना लसीकरण मोहिमेत समाविष्ट करुन आरोग्य सेवेत सामावून घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महासंघाचे डाॅ. कांतीलाल टाटिया, अध्यक्ष हर्षल मराठे व विलास मराठे उपस्थित होते.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करणार असून सदर भरतीत कोरोना काळात काम केलेल्या नर्सेस भगिनी व कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले.