युवकाच्या मृत्यूची चौकशीची मागणी
By Admin | Updated: January 18, 2017 00:01 IST2017-01-18T00:01:35+5:302017-01-18T00:01:35+5:30
नंदुरबार : शहरातील कोकणीहिल परिसरात राहणारा युवक हसमुख भालचंद्र सोनार याचा मृतदेह 14 जानेवारी रोजी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता़

युवकाच्या मृत्यूची चौकशीची मागणी
नंदुरबार : शहरातील कोकणीहिल परिसरात राहणारा युवक हसमुख भालचंद्र सोनार याचा मृतदेह 14 जानेवारी रोजी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता़ मयत सोनार यांचा घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस प्रशासनाने त्यादृष्टीने तपास करण्याची मागणी समस्त वैैश्य सुवर्णकार समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आह़े
या निवेदनात म्हटले आहे की, 9 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या हसमुख सोनार याचा मृतदेह 14 रोजी विमलविहार जवळच्या खदानीत आढळून आला होता़ या मृतदेहाचे केवळ धड शिल्लक होत़े डोके व पाय दिसून आले नाहीत़ तसेच मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला आह़े हसमुख याचा खून किंवा घातपात संशय व्यक्त करण्यात आला आह़े समाजातर्फे पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यात आली़ यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष धनसुख सोनार, उपाध्यक्ष सत्यवान सोनार, पांडुरंग सराफ, राधेश्याम सोनार, सुनील सोनार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होत़े