वडाळी ते काकर्दा मार्गावरील रंगूमदी नदीवर पूल उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST2021-05-11T04:31:53+5:302021-05-11T04:31:53+5:30
मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने पाच वर्षांची हमी दिलेली असते. मात्र, या रस्त्याकडे कोणीही फिरकूनदेखील पाहिले नाही. त्यामुळे या रस्त्यासंदर्भात तातडीने ...

वडाळी ते काकर्दा मार्गावरील रंगूमदी नदीवर पूल उभारण्याची मागणी
मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने पाच वर्षांची हमी दिलेली असते. मात्र, या रस्त्याकडे कोणीही फिरकूनदेखील पाहिले नाही. त्यामुळे या रस्त्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात येत नाही. या मार्गाने काकर्दा, खापरखेडा, अभणपुरा तसेच स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्थान परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या संकल्पनेतील भावकृषी येथे जाता येत असल्याने या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. हा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक चारला जोडला गेला असल्याने गुजरात व मध्यप्रदेशात जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी प्राणघातक वळणे असल्याने संबंधित वाहनचालकाला दिशादर्शक फलक नसल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. हा रस्ता दोन्ही बाजूने काटेरी झुडपांनी व्यापला असून, वाहनधारकांचे वेगावर नियंत्रण नसल्याने समोरील वळणे दिसत नसून, पर्यायाने या ठिकाणी अपघात होतात. यावर दिशादर्शक फलक लावणे किंवा गतिरोधक टाकणे आवश्यक असताना सदर ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर जीवघेणा अपघातात प्राण गमावणाऱ्यांच्या संख्याप्रमाणेच गंभीर जखमींची संख्याही अलीकडेच वाढल्याचे दिसून आले आहे. त्या रस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागासह, ठेकेदाराने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ वाहनधारकांकडून होत आहे.
वडाळीपासून सहा किलोमीटरवर काकर्दा ते वडाळी रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झाला असून, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे झाली आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाही याचा त्रास होत आहे. या मार्गाला लागूनच परिसरातील शेतकऱ्यांचे शेतशिवार आहेत.
- आत्माराम बैसाणे, शेतकरी, वडाळी