रजाळे येथील गावांतर्गत काँक्रीटीकरण रस्ता करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:49+5:302021-08-28T04:33:49+5:30
निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानक ते पुलापर्यंतच्या रस्त्याची पावसाळ्यात अत्यंत दुर्दशा झाली आहे. तरी संबंधित विभागाने या रस्त्याची त्वरित ...

रजाळे येथील गावांतर्गत काँक्रीटीकरण रस्ता करण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानक ते पुलापर्यंतच्या रस्त्याची पावसाळ्यात अत्यंत दुर्दशा झाली आहे. तरी संबंधित विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे रजाळे ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रजाळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेला डांबरीकरणाचा रस्ता वैंदाणे गावाला पोहोचतो. परंतु या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तसेच पावसाचे पाणी साचत असून, वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच अपघातालादेखील सामोरे जावे लागते. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला पाण्याचा निचरा व्हावा, यासाठीदेखील सोय करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सरपंच रेखा पाटील यांची स्वाक्षरी आहे.