स्टेशनरोड मोकळा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:23 IST2020-05-19T12:23:25+5:302020-05-19T12:23:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुनी पालिका चौक ते जुनी कोर्ट इमारतपर्यंत रस्त्यावर भाजीपाला व्यावसायिकांना जागा दिली गेली आहे. ...

Demand for clearing station road | स्टेशनरोड मोकळा करण्याची मागणी

स्टेशनरोड मोकळा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुनी पालिका चौक ते जुनी कोर्ट इमारतपर्यंत रस्त्यावर भाजीपाला व्यावसायिकांना जागा दिली गेली आहे. परंतु हा रोड वाहतुकीसाठी बंद न केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे हा रस्ता पुर्वीप्रमाणेच रहदारीसाठी मोकळा करावा अशी मागणी होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात या रस्त्यावर भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून जागा दिली गेली होती. परंतु काही दिवसच त्याचे पालन झाले. त्यानंतर विक्रेत्यांची येथे गर्दी होऊ लागली. शिवाय दुचाकी व चारचाकी वाहने देखील या रस्त्याने ये-जा करू लागली. परिणामी रस्त्यावर एक प्रकारे जत्राच राहत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन येथे होत नाही.
हा रस्ता एकतर रहदारीसाठी पुर्ण मोकळा करावा किंवा केवळ व्यावसायिकांनाच येथे परवाणगी द्यावी अशी मागणी वाहनधार, व्यावसायिकांकडून होत आहे.

Web Title: Demand for clearing station road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.