आरोग्य सहायकाची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:28+5:302021-06-17T04:21:28+5:30
भागापूर उपकेंद्रातील आरोग्य सहायक किशोर खैरनार यांची प्रतिनियुक्ती पुरूषोत्तम नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या चार वर्षांपासून करण्यात आली ...

आरोग्य सहायकाची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी
भागापूर उपकेंद्रातील आरोग्य सहायक किशोर खैरनार यांची प्रतिनियुक्ती पुरूषोत्तम नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या चार वर्षांपासून करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात विविध अडचणीचा सामना करावा लागला होता. सध्या कोरोनासारख्या महामारीतून जसे तसे नागरिक सावरत असून, सध्या पावसाळ्याची सुरूवात झाली आहे व पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयी समस्या आमच्या भागात फारच बिकट परिस्थिती निर्माण करून देतात.
गेल्या चार वर्षांपासून आरोग्य सहाय्यकाच्या रिक्त जागेमुळे विविध अडचणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. एकीकडे शासन आरोग्य यंत्रणांवर लाखो रूपये खर्च करण्यास आज ही तयार आहे. तर दुसरीकडे असे तालुक्यातील बरेचसे उपकेंद्र आहे की, जे केवळ नावालाच आहे. अशा या रिक्त पदामुळे व आरोग्य विषयी गावात जनजागृती व येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी शासनाने असे रिक्त पदे किंवा असे प्रतिनियुक्ती केलेले आरोग्य सहायक त्यांच्याच उपकेंद्रात राहण्याची आजची गरज आहे.
गेल्या चार वर्षांपासून सुलवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे भागापूर उपकेंद्रातील आरोग्य सहायक यांची आरोग्य प्रशासनाने पुरूषोत्तम नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रतिनियुक्ती केली असून, या नियुक्तीमुळे भागापूर परिसरातील आरोग्य प्रश्नासह लसीकरणाबाबत आजची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक उपकेंद्राला असलेले निवडक कर्मचाऱ्यांवर कामाचा भार अधिक होत असल्याने रूग्णाची गैरसोय होत असते. त्यामुळे पुरूषोत्तम नगर येथे आरोग्य सहायक किशोर खैरनार यांची प्रतिनियुक्ती रद्द करून भागापूर येथील उपकेंद्रात पुन्हा रूजू करून नागरिकांचा त्रास कमी होईल अशी मागणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुलवाडे यांच्याकडे भागापूर येथील सरपंच व उपसरपंचासह ग्रामस्थांनी यांनी केली आहे.
भागापूर येथील आरोग्य सहायक किशोर खैरनार यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर माहिती दिली असून, लवकरात लवकर रिक्त पद भरण्यात येणार असून, नागरिकांचा होणार त्रास कमी होण्यास मदत होईल. - राजेंद्र वळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शहादा