रात्रीचा लिलाल रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:50+5:302021-02-09T04:34:50+5:30

एसटी बसेससाठी पाठपुरावा सुरूच अक्कलकुवा : सातपुड्याच्या दुर्गम भागातील गाव-पाड्यांवर एसटी बसेस सुरू व्हावी यासाठी प्रवाशांकडून पाठपुरावा सुरू आहे. ...

Demand to cancel the night auction | रात्रीचा लिलाल रद्द करण्याची मागणी

रात्रीचा लिलाल रद्द करण्याची मागणी

एसटी बसेससाठी पाठपुरावा सुरूच

अक्कलकुवा : सातपुड्याच्या दुर्गम भागातील गाव-पाड्यांवर एसटी बसेस सुरू व्हावी यासाठी प्रवाशांकडून पाठपुरावा सुरू आहे. भांग्रापाणी, जमाना, काठी, भगदरी, वडफळी या मार्गांवर बसेस वाढवण्याची मागणी आहे. बसेस नसल्याने दुर्गम भागातील नागरिक अवैध प्रवासी वाहनांचा आधार घेतात. गेल्या यातून त्यांच्या जीवालाही धोका आहे.

क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

नंदुरबार : राज्य टेनिसबाॅल क्रिकेट असोसिएशन तसेच औरंगाबाद जिल्हा टेनिसबाॅल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय टेनिसबाॅल दोन गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून संघ निवड करण्यात येणार आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जीटीपी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर ही निवड चाचणी होणार आहे. ज्युनियर व सिनियर गटातील खेळाडूंनी उपस्थिती देण्याचे सचिव योगेश परदेशी यांनी कळवले आहे.

Web Title: Demand to cancel the night auction