अनुप मंडल विरोधात कारवाई करण्याची अक्कलकुवा तालुका जैन समाजाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:15+5:302021-06-09T04:38:15+5:30
निवेदनात, अनुप मंडल ही जैन समाजविरोधी संघटना आहे. राजस्थान राज्यातील सिरोही येथे त्यांचे मुख्य कार्यालय आहे. मागील अनेक वर्षांपासून ...

अनुप मंडल विरोधात कारवाई करण्याची अक्कलकुवा तालुका जैन समाजाची मागणी
निवेदनात, अनुप मंडल ही जैन समाजविरोधी संघटना आहे. राजस्थान राज्यातील सिरोही येथे त्यांचे मुख्य कार्यालय आहे. मागील अनेक वर्षांपासून अनुप मंडलचे सदस्य हे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथील ग्रामीण भागातील अशिक्षित व गरीब लोकांना गोळा करून जैन धर्माचा, साधुसंतांच्या विरोधात दुष्पप्रचार करून द्वेष निर्माण करीत आहे. जैन धर्मावर चुकीचे वक्तव्य करणे, अपप्रचार करणे, जैन साधू - साध्वी यांच्यासोबत दुर्व्यवहार करणे, जैन तीर्थक्षेत्रात अतिक्रमण करणे, स्थानिक जैन समाजाच्या लोकांना धमकावणे अशी अनेक कार्ये अनुप मंडलचे सदस्य करीत आहेत. या संघटनेकडून जैन समाजाबाबत चुकीचे लिखाण करण्यात आले आहे. जैन समाज हा एक शांतीप्रिय व अहिंसावादी समाज आहे, तसेच जैन समाजाचे साधुसंत हे भगवान महावीर यांनी दिलेले अहिंसा परमो धर्म, जीवदया, मैत्री भाव यासारखे चांगले संदेश समाजात देत असतात. असे असताना अनुप मंडळद्वारे तथ्यहीन भ्रामक प्रचार केला जात आहे. या प्रकारामुळे सकल जैन समाजाच्या भावना दुखविल्या जात आहेत. यामुळे संपूर्ण देशात अनुप मंडलवर प्रतिबंध कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जैन समाजातर्फे संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे.
यावेळी अक्कलकुवा श्री मूर्तिपूजक जैन संघाचे अध्यक्ष प्रेमचंद जैन, श्री स्थानकवासी जैन संघ अध्यक्ष भिकमचंद जैन, खापर जैन श्रीसंघ अध्यक्ष सुरेशचंद जैन, वाण्याविहीर जैन श्रीसंघ अध्यक्ष मदनलाल जैन, जेष्ठ पदाधिकारी मोहनलाल जैन, जीवनलाल भंसाली, प्रकाशचंद जैन, अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषद खान्देश प्रदेशाध्यक्ष अरविंद बोथरा, केयूप अक्कलकुवा अध्यक्ष मनोज डागा, केयूप अल्पसंख्याक प्रकोष्ठ राष्ट्रीय संयोजक शुभम भंसाली, ब्रिजलाल चोपडा, दिलीप जैन, नीलेश जैन, विनोद जैन, संतोषचंद जैन, रमेश जैन, सुरेशचंद जैन, विजय जैन, रतनलाल जैन, कुणाल जैन, अतुल जैन, कुशल जैन, आदींसह तालुक्यातील अक्कलकुवा, खापर, वाण्याविहीर येथील समाज बांधव उपस्थित होते. अक्कलकुवा पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश चौधरी यांनी निवेदन स्वीकारले.