अदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:47+5:302021-02-25T04:38:47+5:30

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात आदिवासी भागात हंगामी स्वरूपात काम करणाऱ्या परप्रांतीय इसमाकडून ...

Demand for action against the perpetrators of atrocities against tribal women | अदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी

अदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात आदिवासी भागात हंगामी स्वरूपात काम करणाऱ्या परप्रांतीय इसमाकडून तसेच गावात दाखल होणारे भांडे,प्लास्टिक साहित्य विक्रेते, बांधकाम ठेकेदार व मजूर यांच्याकडून आदिवासी समाजातील गरीब महिला व मुलींना पैशाचा लोभ दाखवत फूस लावून पळवून नेत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. फूस लावून पळवून नेणाऱ्या इसमाची पहिली पत्नी असतानादेखील या भागातील मुलींना लोभ दाखवून पळवून नेऊन अत्याचार करतात. तसेच गावात दाखल होणाऱ्या परप्रांतीय इसमांची ग्रामपंचायत,तालुका किवा जिल्हा स्तरावर कोणतीही नोंद नसल्याने त्यामुळे अशा इसमाच्या तपास कार्यात अडचणी निर्माण होत आहे. परप्रांतीय व्यक्तींची रीतसर नोंदणी होणे गरजेचे असून गैरकृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.

Web Title: Demand for action against the perpetrators of atrocities against tribal women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.