आरोग्य केंद्राच्या आवारात रुग्णवाहिकेतच झाली प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:24+5:302021-03-27T04:31:24+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, २६ रोजी कुंडी, ता. अक्कलकुवा येथील एका दुसरी खेपेच्या मातेला घेऊन प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरांबाच्या ...

आरोग्य केंद्राच्या आवारात रुग्णवाहिकेतच झाली प्रसुती
मिळालेल्या माहितीनुसार, २६ रोजी कुंडी, ता. अक्कलकुवा येथील एका दुसरी खेपेच्या मातेला घेऊन प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरांबाच्या आवारात रुग्णवाहिका पोहचली. प्रसूतीच्या कळा- वेदना तीव्र असल्याने गाडीतच प्रसूती करण्याचा निर्णय डाॅ. प्रमोद सोनवणे यांनी घेतला आणि पाच मिनिटातच तीन किलो वजनाचे बाळासह सुखरूप नाॅर्मल प्रसृती केली. बाळ गाडीतून घेऊन वाॅर्मर कक्षात नेत असताना आनंदीत झालेल्या प्रसूत मातेच्याच पतीने उत्साहात मोबाईलमध्ये वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रमोद सोनवणे यांच्या तत्पर सेवेचा एक फोटो काढला.
मोरांबासारख्या सातपुड्याच्या डोंगरातील अतिदुर्गम भागातील आरोग्य केंद्रात या वर्षांत जवळपास १८० प्रसूती करण्याचा नवीन उच्चांक गाठला असून झिरो होम डिलिव्हरीचे लक्ष्य गाठून माता व बाल मृत्यूदर निच्चांकी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारीवृंद प्रयत्नशील आहेत असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
यावेळी ओपीडीच्या वर्षा वसावे, सिस्टर व ज्ञानेश्वर रोकडे, रवी गायकवाड व मातेच्या नातेवाईकांनी सहकार्य केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. स्वप्नील मालखेडे, वैद्यकीय अधिकारी डॅा. प्रफुल्ल पठाडे, डाॅ. योगेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.