आरोपीचे पोलिसांच्या हातावर तूरी देत पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:24 IST2019-05-17T12:24:07+5:302019-05-17T12:24:34+5:30
पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा : शहादा पोलीस ठाण्यातून ठोकली धूम

आरोपीचे पोलिसांच्या हातावर तूरी देत पलायन
नंदुरबार : आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना शहादा पोलीस ठाण्यातूनच आरोपीने पोलिसांच्या हातून निसटून धूम ठोकली़ याबाबत आरोपीस पळवून लावल्याप्रकरणी पोलिस नाईक शिवदास तुकाराम मालचे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आरोपीने पोलिसांच्या हातावर तूरी देत पळ काढल्याने शहादा पोलिसांना नामुष्किचा सामना करावा लागला़
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कचरु गोरखनाथ शिंदे रा़ नांदेरा ता़ गंगापूर जि़ औरंगाबाद याला वारंटमध्ये ठेवण्यात आले होते़ न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असता सदर आरोपीने शहादा येथील पोलीस ठाण्यातून पळ काढला़ या घटनेमुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली़ आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही़ या घटनेमुळे शहादा पोलिस ठाण्यातील गलथान कारभार समोर आला असल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे़ दरम्यान, हवालदार आतिक अल्लाउद्दीन सैय्यद यांच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी शिवदास तुकाराम मालचे यांच्याविरुधद गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास आय़यु़ पाटील करीत आहेत़