मानवी हस्तक्षेपामुळे जीवसृष्टीचा ऱ्हास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:53+5:302021-06-16T04:40:53+5:30
दिवसेंदिवस बेसुमार होणारी वृक्षतोड यामुळे हवामानातील उष्माचे प्रमाणही वाढल्याने जंगली पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे. पक्ष्यांची संख्या कायम ठेवण्यासाठी ...

मानवी हस्तक्षेपामुळे जीवसृष्टीचा ऱ्हास
दिवसेंदिवस बेसुमार होणारी वृक्षतोड यामुळे हवामानातील उष्माचे प्रमाणही वाढल्याने जंगली पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे. पक्ष्यांची संख्या कायम ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक विकास व्हायला हवा नाहीतर पक्षी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. भविष्यात आपल्याला पावसाचे प्रतिकूल-अनुकूल बदलाचे संकेत देणारे पक्ष्यांचे आवाज आणि कावळ्यांची घरटी केवळ पुस्तकात पाहायला मिळतील.
पक्ष्यांचे मंजूळ स्वर ही लुप्त
पक्ष्यांना हवामानाचे ज्ञान उपजत असते. पाणकोंबडी, पावश्या, मोर या पक्ष्यांच्या पावसापूर्वीच्या ओरडण्यावरून पाऊस येणार असल्याचे संकेत मिळत होते. रोहिणी नक्षत्र सुरू झाला की जून महिन्याच्या प्रारंभापासून पक्षी जोरजोरात ओरडून एकमेकांना पाठलाग करताना दिसतात. विणीच्या हंगामात नर, मादीची घरटी बांधण्याची लगबग हे पावसाचे संकेत देते. पण पक्ष्यांची शिकार आणि वृक्षतोडीमुळे संख्या घटली. कावळ्याची काव..काव.., चिमण्यांची चिव..चिव.., मोरांचा... केका पहाटेचे मंजूर स्वर लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे.