दीपक पाटील यांची जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:01 IST2019-01-23T13:01:53+5:302019-01-23T13:01:57+5:30

शहादा : सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांची नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार अमरिशभाई ...

Deepak Patil elected as District Congress Executive President | दीपक पाटील यांची जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड

दीपक पाटील यांची जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड

शहादा : सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांची नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार अमरिशभाई पटेल यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
दीपक पाटील यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेवून काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांची नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात येवून ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते पाटील यांना देण्यात आले. यावेळी शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, माजी नगरसेवक के.डी. पाटील, प्रभाकर चव्हाण, जे.पी. पाटील आदींनी उपस्थिती होती.
पाटील यांनी यापूर्वीही नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, शहादा पंचायत समिती सभापती, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राज्य दूध उत्पादक संघ महानंदाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक, अखिल भारतीय वस्त्रोद्योग महामंडळाचे स्वीकृत संचालक, अखिल भारतीय गुजर्र समाजाचे उपाध्यक्ष व कार्यकारी अध्यक्ष पदासह लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुतगिरणीचे चेअरमन, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदी पदांची जबाबदारी सांभाळली आहे. दीपक पाटील यांचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अभिनंदन केले.
 

Web Title: Deepak Patil elected as District Congress Executive President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.