माहितीच्या जाळात कोरोनाचे आकडे खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:19 PM2020-09-22T12:19:48+5:302020-09-22T12:20:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत ...

Deep down the corona numbers in the web of information | माहितीच्या जाळात कोरोनाचे आकडे खोलात

माहितीच्या जाळात कोरोनाचे आकडे खोलात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत आहे़ सतत बदलणाऱ्या आकडेवारीमुळे समाजमन अस्वस्थ आहे़ परंतु दुसरीकडे केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर माहिती देणाºया शासनाच्या वेबसाईट्सवरचे आकडे भ्रमित करणारे असल्याचे समोर आले आहे़
नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता़ यानंतर जून ते जुलै या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढती राहिली आहे़ एप्रिल ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात आकडेवारी ही साडेचार हजाराच्या घरात पोहोचली आहे़ यात १११ जणांचा मृत्यू तर तीन हजार नागरिकांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे़ जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत दररोज आकडेवारी प्रसारित करुन माहिती देण्यात येत आहे़ जिल्हा प्रशासनाकडून दरदिवशी समोर येणाºया रुग्णांची माहिती ही सोशल मिडियातून वेळोवेळी प्रसारित करुन नागरिकांना माहिती देण्यात येत आहे़ ही बाब चांगली असली तरीही महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मात्र जिल्ह्यात कोरोनाबाधित आणि मयत यांची संख्या ही जिल्ह्यातील नियमित संख्येपेक्षा अधिकच असल्याचे समोर येत आहे़
ह्या सर्व वेबसाईट्स केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याचे आहेत़ असे असतानाही आकड्यांमध्ये नियमित तफावत जिल्ह्याबाहेर राहून माहिती घेणाºया जिल्ह्यातील मूळ रहिवाशांची चिंता वाढवणारी ठरत आहे़ यात सुधार करणे करण्याची अपेक्षाही त्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती़ परंतू आकडेवारीत सुधारणा झालेली नाही़

४नंदुरबार जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दुपारी जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या ही ४ हजार ५७२ एवढी दिसत होती़ याचवेळी राज्य आणि केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ही संख्या ४ हजार ६७२ एवढी दिसत होती़ जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत मयतांची संख्या ही १०८ होती़ सोमवारी तिघांचा मृत्यू झाल्यानंतर ही आकडेवारी १११ झाली़ परंतू रविवारी दुपारपासून सर्व संकेतस्थळावर १११ हीच संख्या पुढे चालवण्यात येत होती़ केंद्र शासनाच्या एका ट्रॅकिंग अ‍ॅपवर नंदुरबार जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह पेशंटची संख्या ही १ हजार १९० दिसत आहे़ प्रत्यक्षात ही संख्या १ हजार २६७ एवढी असल्याचे समोर आले होते़ ही माहिती नागरिक शेअर करत असल्याने आकड्यांची तफावत संभ्रम निर्माण करते़

एकीकडे दाखल आणि मयतांच्या आकडेवारीचा गोंधळ असताना दुसरीकडे बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे़ जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ हजार ३२२ जणांना सोडून देण्यात आले आहे़ परंतु केंद्राच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी ३ हजार ३७१ एवढी दिसत आहे़ तब्बल १९१ रुग्णांच्या संख्येबाबत हा गोंधळ आहे़
सोशल मिडियासोबत केंद्र आणि राज्य सरकारने काढलेल्या अ‍ॅप आणि संकेतस्थळावर स्थानिक नागरिक माहिती घेऊन पडताळणी करत आहेत़ रुग्ण संख्या कमी अधिक दिसत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाबाबत गैरसमज वाढून भितीही वाढत आहे़

Web Title: Deep down the corona numbers in the web of information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.