बिलाडी येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:15+5:302021-05-28T04:23:15+5:30
कार्यक्रमास जि.प.चे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, हेमलता शितोळे, सरपंच जवाहर पाटील, उपसरपंच गुलसिंग दशरथे, ग्रा.पं. सदस्य सिद्धार्थ सामुद्रे, ...

बिलाडी येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण
कार्यक्रमास जि.प.चे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, हेमलता शितोळे, सरपंच जवाहर पाटील, उपसरपंच गुलसिंग दशरथे, ग्रा.पं. सदस्य सिद्धार्थ सामुद्रे, पं.स.चे माजी सदस्य सखाराम पाटील, पोलीस पाटील गणेश पाटील, वसंत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. अभिजित पाटील म्हणाले की, सध्या वेगवेगळ्या साथीच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी व व्यवस्थित रहावे यासाठी छोट्याशा गावात शुद्ध पाण्याची सोय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याचा फायदा शेवटच्या घटकातील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले. हेमलता शितोळे म्हणाल्या की, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायत शासकीय योजनेच्या फायदा घ्यावा, असे सांगितले. प्रास्ताविक ग्रामसेवक बी.बी. गिरासे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन पत्की यांनी तर आभार सरपंच जवाहर पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.