तळोद्यात ओपन जीमचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:19+5:302021-05-26T04:31:19+5:30
शासनाच्या आदिवासी उपयोजनेतून शहरातील अनेक ठिकाणी ओपन जीमचे साहित्य देण्यात आले आहेत. प्रभाग दोनमध्ये देखील हे साहित्य देण्यात आले ...

तळोद्यात ओपन जीमचे लोकार्पण
शासनाच्या आदिवासी उपयोजनेतून शहरातील अनेक ठिकाणी ओपन जीमचे साहित्य देण्यात आले आहेत. प्रभाग दोनमध्ये देखील हे साहित्य देण्यात आले आहे. हे साहित्य या प्रभागाचे नगरसेवक जितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी यांनी स्वखर्चातून उभारलेल्या गार्डनमध्ये बसविण्यात आले आहे. या जिमचे लोकार्पण मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक भास्कर मराठे, अमनुद्दिन शेख, हितेंद्र क्षत्रिय, अनुप उदासी, जितेंद्र दुबे, जालंधर भोई, राजेंद्र पाडवी, अरूण मगरे, नारायण कलाल, श्रावण क्षत्रिय, योगेश मराठे उपस्थित होते. याप्रसंगी उदेसींग पाडवी यांनी या प्रभागातील दोन्ही नगरसेवकांनी आपल्या खर्चातून उभारलेल्या सुंदर गार्डन बाबत कौतुक करून प्रभागातील समस्यांसाठी हे दोन्ही नगरसेवक सतत प्रयत्नशील असतात. तसेच नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याने त्यांची जिल्हा भरात त्याची चांगली चर्चा होत असते असे सांगितले. अजय परदेशी यांनी प्रभागातील कामांसाठी नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आभार संदीप परदेशी यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.