पालकमंत्री पाडवी यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:10+5:302021-05-27T04:32:10+5:30

यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य ...

Dedication of ambulances by Guardian Minister Padvi | पालकमंत्री पाडवी यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

पालकमंत्री पाडवी यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे शक्य होईल, असा विश्वास ॲड. पाडवी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सांगितले की, रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेता येईल. कोरोनाबाधितांना देखील चांगली सुविधा उपलब्ध होईल. आपल्या आमदार निधीतून ६ आणि आमदार नाईक यांच्या आमदार निधीतून ७ रुग्णवाहिका मिळणार असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होईल. सर्व मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले प्रयत्न करीत आहेत. आमदार राजेश पाडवी यांच्या आमदार निधीतून देखील यापूर्वी ४ रुग्णवाहिका घेण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

जिल्ह्यासाठी कोरोना संकटकाळात विविध माध्यमातून ४९ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ७ रुग्णवाहिका यापूर्वी शासनातर्फे प्राप्त झाल्या असून इतर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत सामाजिक उत्तरदायित्व निधी व विविध संस्थांकडून प्राप्त झाल्या आहेत. मंगळवारी प्राप्त रुग्णवाहिका कोपर्ली, मोरंबा, सुलवाडा, कुसुमवाडा, झामणझर, काकडदा, चुलवड येथील आरोग्य केंद्रांसाठी उपयोगात आणल्या जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर ‘ॲम्ब्युलन्स ट्रॅकिंग सिस्टीम’ विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील रुग्णवाहिकेची माहिती आणि चालकाचा क्रमांक तत्काळ मिळणार आहे.

Web Title: Dedication of ambulances by Guardian Minister Padvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.