लोणखेडा येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST2021-08-27T04:33:14+5:302021-08-27T04:33:14+5:30
कार्डिॲक रुग्णवाहिकेचे वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास (व्हेंटिलेटर), ऑक्सिजन सुविधेसह डीसी शॉक, ट्रान्सपोर्ट मॉनिटर, सिरीज पंप, अद्ययावत ट्राॅमा अशा अत्याधुनिक ...

लोणखेडा येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
कार्डिॲक रुग्णवाहिकेचे वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास (व्हेंटिलेटर), ऑक्सिजन सुविधेसह डीसी शॉक, ट्रान्सपोर्ट मॉनिटर, सिरीज पंप, अद्ययावत ट्राॅमा अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी नेण्यासाठी कार्डिॲक रुग्णवाहिका आवश्यक असते. त्यासाठी लोणखेडा व परिसरातील नागरिकांना याचा मोठा आधार होणार आहे. मागील काळात सातत्याने ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत होती. त्यात लोणखेडा गावातही कमी-अधिक प्रमाणात रुग्ण वाढत होते. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता पुढील काळात अजून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो त्यासाठी गाव व परिसरात सॅनिटायझर फवारणी यंत्र उपलब्ध होणार आहे व गंभीर रुग्णांना कार्डिॲक रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळणार आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक दशरथ पाटील, चेअरमन देविदास पाटील, संचालक सुभाष पाटील, संजय पाटील, सुरेश चौधरी, रोहिदास भिल, भरत सोनवणे, बापू सोनार, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.