दुर्गम भागातील दोन गावात दारुबंदीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 11:45 IST2018-11-20T11:44:49+5:302018-11-20T11:45:00+5:30

दारू विक्रेत्यांचाही पाठींबा : खर्डीखुर्द व केवलापाणी ग्रामस्थांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक

Decision to make liquor ban in two remote areas | दुर्गम भागातील दोन गावात दारुबंदीचा निर्णय

दुर्गम भागातील दोन गावात दारुबंदीचा निर्णय

तळोदा : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम भागातील खर्डी खुर्द व केवलापाणी या तळोदा तालुक्यातील दोन आदिवासी गावांनी एकत्र येवून गावक:यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी सर्वाच्या संमतीने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर दारू बनविणा:या व्यावसायिकांनीदेखील गावक:यांच्या विनंतीस मान्यता देवून दारू न बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गावातील गावक:यांच्या या स्तुत्य निर्णयाने परिसरातील गावांनी कौतुक केले आहे.
तळोदा तालुक्यातील सातपुडय़ाच्या पायथ्याशी केवलापाणी व खर्डी खुर्द ही गावे वसली आहेत. तळोदा शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर            ही आहेत. संपूर्ण आदिवासी वस्ती            या गावांमध्ये राहत असते. खर्डी खुर्दला ग्रामपंचायत असून, कवेलापाणीचा समावेशही या ग्रामपंचायतीत करण्यात आला         आहे. 
केवलापाणीची लोकसंख्या 600 तर खर्डी खुर्दची 400 इतकी आहे. या दोन्ही गावांमधील लोकांमध्ये दारूचे व्यसन प्रचंड प्रमाणात वाढले होते. त्यातही तरूणांमध्येदेखील व्यसनाचे प्रमाण अधिक होते. व्यसनापायी गावक:यांमध्ये आपसात मोठ-मोठी भांडणे होत असते. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या व्यसनामुळे महिलादेखील प्रचंड वैतागल्या           होत्या. साहजिकच दोन्ही गावातील काही गावक:यांनी इतारांना व्यसनापासून मुक्त करण्याचा             प्रय} केला. यासाठी त्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर या गावातील रहिवाशांनी 16 नोव्हेंबर 2018 रोजी केवलापानी येथे एकत्र येवून            बैठक घेतली. गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाडवी व                    गावांचे पोलीस पाटील कुवरसिंग पाडवी यांनी गावक:यांना व्यसनाधिनतेबाबत मार्गदर्शन केले. तसेच व्यसनमुक्त होण्याचे आवाहनही केले. त्यानुसार दोन्ही गावातील ग्रामस्थांनी गावात दारूबंदीचा एकमुखी निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर दारूबंदीच्या या निर्णयाला गावातील दारू बनविणा:या व्यावसायिकांनीदेखील पाठींबा देवून दारू न बनविण्याचा निर्णय घेतला आहे. 
विशेष म्हणजे जातीरिवाजाप्रमाणे संसारोपयोगी वस्तुंसाठी घेण्यात येणारी दहेजची रक्कमही कमी करण्यात आली आहे. गावातील दारूबंदी दरम्यान कुणी दारू पिलेला आढळून आला तर त्याच्यावर  दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. केवलापानी व खुर्दी खुर्द गावातील दारु बंदीसाठी पोलीस पाटील गुलाबसिंग पाडवी, अमरसिंग पाडवी, कुवरसिंग पाडवी, राजेंद्र पाडवी, राधाबाई पाडवी, माकणीबाई पाडवी, टिनूबाई पाडवी, सुनिताबाई पाडवी, केनाबाई पाडवी यांनी पुढाकार घेतला होता.

Web Title: Decision to make liquor ban in two remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.