220 मीटरच्या निर्णयामुळे आठ दुकान, परमिटरुमला अभय
By Admin | Updated: April 7, 2017 18:53 IST2017-04-07T18:53:49+5:302017-04-07T18:53:49+5:30
अध्यादेशातील 220 मीटरच्या आतचा मुद्दा घेवून अनेकजण आपली दुकाने, परमीटरूम वाचविण्याचा प्रय} करीत आहेत.

220 मीटरच्या निर्णयामुळे आठ दुकान, परमिटरुमला अभय
नंदुरबार, दि. 7 - : राष्ट्रीय व राज्य मार्गावरील 500 मीटरच्या आत असलेल्या दारू दुकाने, परमीटरूम बंद करण्याचा अध्यादेशातील अनेक बारीकसारीक बाबी तपासून त्यातून मार्ग काढण्याचा प्रय} सुरू आहे. आता त्याच अध्यादेशातील 220 मीटरच्या आतचा मुद्दा घेवून अनेकजण आपली दुकाने, परमीटरूम वाचविण्याचा प्रय} करीत आहेत. याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आठ दुकान, परमीटरूमला अभय मिळणार आहे. त्यात कोळदा, ता.नंदुरबार शिवारातील एक तर खापर आणि अक्कलकुवा शिवारातील अनुक्रमे चार व तीन दुकानांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने अध्यादेश काढून 1 एप्रिल पासून राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील 500 मीटरच्या आत दारू दुकाने व परमिटरूम बंद करण्याचा अध्यादेश काढला होता. त्याची अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे. नंदुरबारत जिल्ह्यात 86 दुकाने व परमिटरूम यांना फटका बसला आहे. आता त्याच अध्यादेशातील उपकलमे आणि इतर बाबी पडताळून दुकाने वाचविण्याचा प्रय} सुरू आहे. त्यानुसार 2011 च्या लोकसंख्येनुसार ज्या गावाची लोकसंख्या 20 हजारांच्या आत आहे अशा गाव हद्दीतील दारू दुकाने, परमिटरुमसाठी आता 220 मीटरची मर्यादा आहे. 220 मीटरच्या बाहेर असलेल्या दुकानांना अभय मिळणार आहे. ही बाब लक्षात घेता व शासनाच्या सूचनेनुसार येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे नव्याने सव्रर्ेेक्षण केले असता अक्कलकुवा, खापर व नंदुरबार परिसरातील आठ दुकाने व परमिटरुमचा समावेश आहे. त्यांचे परवाने पुन्हा सुरू करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन घुले यांनी सांगितले.