चिपळूनच्या महिलेकडून प्रकाशातील एकाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:25 IST2019-04-21T12:24:31+5:302019-04-21T12:25:05+5:30
आर्थिक गुन्हा । २७ लाख रुपये लाटले

चिपळूनच्या महिलेकडून प्रकाशातील एकाची फसवणूक
नंदुरबार : जमिन आणि घर खरेदीसाठी पैसे घेऊन ते परत न करता प्रकाशा येथील एकाची चिपळून येथील महिलेने २७ लाख रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे़ २०१५ ते जानेवारी २०१९ दरम्यान हा प्रकार घडला़
संतोष अर्जुन दळवी रा़ आष्टी जि़ बीड, हल्ली मुक्काम प्रकाशा ता़ शहादा असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे़ संतोष दळवी यांची २०१५ मध्ये नुरसत नुरमहोम्मद चौगुले नामक महिलेसोबत ओळख झाली होती़ या ओळखीतून नुसरत हिने संतोष दळवी यांच्याकडून वेळवेळी जमिन आणि घर खरेदी करण्यासाठी वेळोवेळी २७ लाख रुपये घेतले होते़ पैश्यांची गरज असल्याने दळवी यांनी मागणी केल्यावर नुरसत हिने पैसे देण्यास नकार दिल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले़ याबाबत संतोष दळवी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नुरसत चौगुले व फारुख नूरमहोम्मद चौगुले या दोघांविरोधात फसवणूकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करत आहेत़
दरम्यान या प्रकरणात फसवणूक होण्याचे कारण दुसरेच असल्याची माहिती समोर येत आहे़ संतोष दळवी यांचे भाऊ आणि वहिनी तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत झालेल्या एका गैरव्यवहाराच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत़ दरम्यान दोघांचा जामीन व्हावा म्हणून ते प्रयत्नशील होते़ यातून त्यांची नुसरत व तिच्या भावासोबत ओळख झाली होती़ जामीन मिळवून देऊ असे सांगून दोघांनी दळवी यांच्याकडून वेळावेळी पैसे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे़