खोंडामळी व नांदर्खेपासून कर्जमुक्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 01:33 PM2020-02-25T13:33:49+5:302020-02-25T13:34:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नांदर्खे आणि खोंडमळी गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध ...

Debt relief started from Khondmali and Nandarkhe | खोंडामळी व नांदर्खेपासून कर्जमुक्तीला सुरुवात

खोंडामळी व नांदर्खेपासून कर्जमुक्तीला सुरुवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नांदर्खे आणि खोंडमळी गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. त्यासोबतच आधार प्रमाणिकरणास सुरूवात करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील नांदर्खे आणि खोंडमळी गावातील आपले सरकार सेवा केंद्र, विविध कार्यकारी सेवा सोसायटी शाखा, जिल्हा बँक शाखा अशा विविध ठिकाणी ही यादी प्रदर्शित करण्यात आली.
यादीनुसार पात्र शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करण्यात येत असून प्रमाणिकरण प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे. प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या शेतकºयांना शासनातर्फे कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
प्रमाणिकरण करताना बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि बोटांचे ठसे यावरून माहिती तपासण्यात येत आहे. एक ते दोन मिनिटाच्या आत ही प्रक्रीया पुर्ण होत असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक आणि सहायक उपनिबंधक निरज चौधरी यांनी दोन्ही गावांना भेट देऊन प्रमाणिकरण प्रक्रीयेची माहिती घेतली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते खोंडमाळी येथे प्रातिनिधीक स्वरुपात आधार प्रमाणिकरण प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. आधार प्रमाणिकरणात समस्या आल्यास त्या त्वरीत दूर करून इतरही गावांमध्ये ही प्रक्रीया तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
पात्र शेतकरी कर्जमुक्तीनंतर एप्रिलपासून पुढील हंगामासाठी कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. खरीप हंगामापूर्वी कर्जमुक्तीचा लाभ मिळत असल्याने येत्या हंगामातील शेतीसाठी याचा खºया अर्थाने उपयोग होईल, अशी प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केली. जाहीर झालेल्या यादीत नांदर्खेच्या २२२ आणि खोंडामळीच्या २१२ शेतकºयांचा समावेश आहे. आधार प्रमाणिकरणासाठी शेतकºयांनी सकाळपासून आपले सरकार सेवा केंद्र आणि बँक शाखेत मार्गदर्शन करण्यात येत होते. मंगळवारीदेखील ही प्रक्रीया सुरू रहाणार आहे. पात्र शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Debt relief started from Khondmali and Nandarkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.