विद्युत पोलवर चढलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू
By Admin | Updated: April 2, 2017 17:50 IST2017-04-02T17:50:58+5:302017-04-02T17:50:58+5:30
विद्युत पोलवर घरगुती वायर काढण्यासाठी चढलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना परिवर्धा, ता.शहादा येथे रविवारी दुपारी घडली.

विद्युत पोलवर चढलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू
परिवर्धा येथील घटना : गावात तर्कवितर्क
शहादा,दि.2- विद्युत पोलवर घरगुती वायर काढण्यासाठी चढलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना परिवर्धा, ता.शहादा येथे रविवारी दुपारी घडली.
नगीन रामदास भिल (34) असे मयत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिवर्धा येथे खाजगी बांधकाम सुरू होते. त्यासाठी तेथून गेलेल्या मुख्य वीज वाहिणीच्या पोलसह स्थानिक विद्युत पुरवठासाठी दोन पोल टाकण्यात आले आहेत. त्यापैकी मुख्य वीज प्रवाहाच्या पोलवरील वायर काढण्यासाठी नगीन रामदास भिल हा पोलवर चढला. परंतु विद्युत पुरवठा सुरू असल्यामुळे त्याला जबर शॉक बसला. तो खाली न कोसळता इतर तारांमध्ये अडकला. परिणामी तेथेच त्याचा मृत्यू झाला. कॉ.मोहन शेवाळे यांनी तातडीने पोलीस ठाणे व वीज कंपनीला कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तीन तासांनी दाखल झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.