अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:28 IST2020-09-23T12:28:15+5:302020-09-23T12:28:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबार दरम्यान धमडाई फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ...

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दुचाकीस्वाराचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबार दरम्यान धमडाई फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता़ १ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा अपघात घडला़ जखमी युवकाचा धुळे येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला़
हर्षद माधव गुरव रा़ धुळे असे मयत युवकाचे नाव आहे़ १ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हर्षद हा एमएच १८ एजी ४३५४ या दुचाकीने तळोदा येथून नंदुरबारकडे येत होता़ दरम्यान धमडाई फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता़ त्याला तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ येथून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले होते़ दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ याबाबत विनायक भास्कर गुरव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करत आहेत़ मार्गावर साईडपट्ट्यांचा अभाव आणि खड्डे यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे़ यामुळे उपाययोजनांची गरज आहे़