एकाच शाळेतील शिक्षक व शिपायाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:07+5:302021-04-17T04:30:07+5:30
शहरातील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय इंग्रजी विषयाचे शिक्षक दशरथ काशीराम ऊर्फ डी.के. माने यांचे १५ एप्रिल रोजी नाशिक ...

एकाच शाळेतील शिक्षक व शिपायाचा मृत्यू
शहरातील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय इंग्रजी विषयाचे शिक्षक दशरथ काशीराम ऊर्फ डी.के. माने यांचे १५ एप्रिल रोजी नाशिक येथे उपचार घेत असताना निधन झाले. तर त्यांच्यापाठोपाठ याच शाळेतील शिपाई परशुराम फकिरा जगदेव यांचे १६ एप्रिल रोजी धुळे येथे उपचार घेताना निधन झाले. वसंतराव नाईक विद्यालय परिवारातील दोन सदस्यांचे दोन दिवसात असे अचानक निधन झाल्याने नाईक विद्यालय परिवारात शोककळा पसरली आहे. संस्थेचे अध्यक्ष सुधीर जाधव, सचिव प्रा. संजय जाधव, प्राचार्य सुनील सोमवंशी, उपप्राचार्य आर. जे. रघुवंशी, उपमुख्याध्यापक एन. बी. कोते यांनी डी. के. माने व पी.एफ. जगदेव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. दोन दिवसात शालेय परिवारातील दोन सदस्यांच्या अचानक निधनाने शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी दु:खात आहेत.
फोटो
प्रा.डी.के. माने - 17nh1
परशुराम जगदेव - 17nh2