सुरत-भुसावळ मार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने मातेसह दीडवर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:56 IST2018-11-11T15:56:34+5:302018-11-11T15:56:41+5:30

नंदुरबार : सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर एक्सप्रेस गाडीतून पडल्याने 28 वर्षीय मातेसह दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला़ ही घटना सात नोव्हेंबर ...

Death of a six-year-old child with a mother on the Surat-Bhusawal road due to a falling train | सुरत-भुसावळ मार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने मातेसह दीडवर्षीय बालकाचा मृत्यू

सुरत-भुसावळ मार्गावर धावत्या रेल्वेतून पडल्याने मातेसह दीडवर्षीय बालकाचा मृत्यू

नंदुरबार : सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर एक्सप्रेस गाडीतून पडल्याने 28 वर्षीय मातेसह दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला़ ही घटना सात नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली़ मयत महिला ही अमरावती येथील असल्याची माहिती आह़े
नवापूर तालुक्यातील कडवान फाटा ते खातगाव यादरम्यान रेल्वेमार्गालगत 28 वर्षीय महिलेस दीड वर्षीय बालक मयतावस्थेत पडून असल्याची माहिती रेल्वे कर्मचा:यांकडून खातगाव स्टेशनमास्तरांना देण्यात आली होती़ यानुसार स्टेशनमास्तरांनी विसरवाडी पोलीसांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली़ याठिकाणी महिला आणि बालक रेल्वेतून पडून जागीच ठार झाल्याचे दिसून होत़े याप्रकरणी विसरवाडी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आह़े दरम्यान मयत महिलेचे नाव कोमलबाई शेखर खांडेकर असे असून त्या पती शेखर खांडकेर व कुटूंबियांसह सुरत येथे जात असल्याची माहिती आह़े 
बुधवारी रात्री साडेनऊ वाजता मुलगा दिव्यांशू याच्यासह रेल्वेतून पडल्याचा अंदाज आह़े बराच वेळ झाल्याने त्या दिसून न आल्याने खांडेकर कुटूंबियांनी  माय-लेकराचा शोध सुरु घेतला होता़ परंतू दोघेही त्यांना दिसून आले नाहीत़ रेल्वेगाडी सुरत येथे पोहोचल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलीसांना संपर्क करत घटनेची माहिती दिली़ सुरत रेल्वे पोलीसांनी नंदुरबार रेल्वे पोलीसात संपर्क केला असता, नवापूर तालुक्यातील खातगाव ते कडवान यादरम्यान महिला व बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली़ मयत महिलेच्या कुटूंबियांनी विसरवाडी ग्रामीण रूग्णालयातून दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला होता़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गावीत करत आहेत़ ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आह़े 
 

Web Title: Death of a six-year-old child with a mother on the Surat-Bhusawal road due to a falling train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.