ट्रॉलाने चिरडल्याने शहाद्यात स्कूटीचालक महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 13:01 IST2018-08-16T13:01:22+5:302018-08-16T13:01:41+5:30

ट्रॉलाने चिरडल्याने शहाद्यात स्कूटीचालक महिलेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव ट्रॉलाने स्कूटीचालक महिलेला कट मारल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना शहाद्यात बुधवारी रात्री घडली. महिला नातेवाईकांकडे कानुबाई स्थापनेचे साहित्य घेण्यासाठी जात असल्याचे समजते.
सोनल संजय भावसार (40) रा.खोलगल्ली, शहादा असे मयत महिलेचे नाव आहे. सोनल भावसार या आपल्या स्कूटीने (क्रमांक एमएच 39-टी 2296) दोंडाईचा रस्त्यावरील भाऊ-तात्या पेट्रोलपंपाजवळून जात होत्या. त्यावेळी मागून आलेल्या ट्रॉलाने त्यांना कट मारला. त्यामुळे त्यांचा तोल जावून त्या ट्रॉलाच्या मागील चाकात आल्या. त्यात त्या चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॉलाचालक तेथून पसार झाला. सोनल भावसार या कानुबाईचे साहित्य आणण्यासाठी नातेवाईकांकडे जात असल्याचे समजते.
याबबत संतोष वाल्हे यांनी फिर्याद दिल्याने ट्रॉला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास फौजदार हसन बागुल करीत आहे.