आई, वडील व मुलाच्या निधनाने कोंढावळ परिसरात हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:49+5:302021-04-13T04:28:49+5:30

याबाबत वृत्त असे की, कोंढावळ येथील देवराम धाकू माळी (७५) हे कोंढावळ येथे पाटबंधारे विभागात कार्यरत होते. ते सेवानिवृत्तीनंतर ...

The death of mother, father and son caused a stir in Kondhawal area | आई, वडील व मुलाच्या निधनाने कोंढावळ परिसरात हळहळ

आई, वडील व मुलाच्या निधनाने कोंढावळ परिसरात हळहळ

याबाबत वृत्त असे की, कोंढावळ येथील देवराम धाकू माळी (७५) हे कोंढावळ येथे पाटबंधारे विभागात कार्यरत होते. ते सेवानिवृत्तीनंतर पत्नी व दोन मुलांसह धुळे येथे स्थायिक झाले होते. मोठा मुलगा सुनील माळी (४०) यास रोजगारासाठी रिक्षा घेऊन दिली तर लहान मुलगा धुळे येथे पोलीस दलात सेवा बजावत आहे. आनंदात प्रपंच सुरू असताना मुलगा सुनील यास १५ दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली. त्यात त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने त्याचे वडील देवराम माळी यांनीही सुनीलच्या मृत्यूच्या चौथ्या दिवशी प्राण सोडले. पाच दिवसांपूर्वी पतीचा व मुलाचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपला. मात्र मुलाचे व पतीच्या निधनाचे दु:ख देवराम माळी यांच्या पत्नी इंदूबाई माळी यांनाही सहन न झाल्याने त्यांचाही पती व मुलाचा दशक्रिया विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे कोंढावळ गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

फोटो-

१) देवराम माळी- 13nh1

२) इंदूबाई माळी- 13nh2

३) सुनील माळी- 13nh3

Web Title: The death of mother, father and son caused a stir in Kondhawal area