उघडय़ा गटारीत पडलेल्या वासरुचा शहाद्यात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:09 IST2019-07-29T13:08:46+5:302019-07-29T13:09:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा शहरातील दूरदर्शन कॉलनीत नव्याने बांधण्यात आलेल्या उघडय़ा गटारीत पडून जखमी झालेल्या वासरूचा अखेर ...

उघडय़ा गटारीत पडलेल्या वासरुचा शहाद्यात मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा शहरातील दूरदर्शन कॉलनीत नव्याने बांधण्यात आलेल्या उघडय़ा गटारीत पडून जखमी झालेल्या वासरूचा अखेर मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यामुळे दूरदर्शन कॉलनीत राहणा:या नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील दूरदर्शन कॉलनी परिसरात नव्याने बांधण्यात आलेले रस्ते, गटारींचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या उघडय़ा गटारींमध्ये बालके पडून जखमी होत असल्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. याबाबत 13 जून रोजी शहादा पालिकेच्या मुख्याधिका:यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु संबंधितांच्या दुर्लक्षामुळे 25 जुलै रोजी उघडय़ा गटारीत वासरू पडून जखमी झाले होते. कॉलनीतील नागरिकांनी वासरू गटारीतून काढून घरीच प्राथमिक उपचार केला. स्थानिक पशुवैद्यकीय अधिका:यांशी संपर्क साधला असता मी सध्या बाहेर आहे, असे सांगितले. नंतर संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे जखमी झालेल्या वासरूला आपला जीव गमवावा लागला. संबंधित विभाग अजून काही मोठी दुर्दैवी घटना होण्याची वेळ पाहत आहे की काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधितांनी या उघडय़ा गटारी झाकाव्यात, अशी मागणी होत आहे.