भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
By Admin | Updated: January 12, 2015 13:34 IST2015-01-12T13:25:23+5:302015-01-12T13:34:04+5:30
शिरसोली रस्त्यावर एमएच १९ /बीयू ५३१३ या कारने रविवारी दुपारी एका सायकल चालकाला धडक दिली. यात एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला.

भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
जळगाव : शिरसोली रस्त्यावर एमएच १९ /बीयू ५३१३ या कारने रविवारी दुपारी एका सायकल चालकाला धडक दिली. यात रमेश भुवा पवार (वय ५0, रा.मेहरुण तलाव) या सायकलस्वाराचा रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जळगाव क्रिटिकल सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
रिक्षाच्या धडकेत पोलीस जखमी
नशिराबादजवळ शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सेवानवृत्त पोलीस कर्मचारी अशोक नामदेव भारंबे (६१), त्यांच्या पत्नी शकुंतला (५८) आणि नातू दर्शन किरण भारंबे (५) सर्व रा.अयोध्यानगर जखमी झाले आहेत. अशोक यांच्या डोक्याला, हाताला मार लागलेला आहे. शकुंतला यांच्या चेहर्याला हाताला दुखापत झालेली असून त्यांचा नातू किरणच्या डोक्याला गंभीर मार बसलेला आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. शिरसोली रस्त्यावरील गुंजन मंगल कार्यालयाजवळ रविवारी एक कार सायकलस्वाराला धडक देत गटारीत जाऊन पडली.