आषाढी एकादशीनिमित्त जयनगर येथील दत्त मंदिर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:27+5:302021-07-20T04:21:27+5:30
जयनगर : सलग दुसऱ्या वर्षीही आषाढी एकादशीवर कोरोना महामारीचे सावट आहे. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमुळे आषाढी एकादशीनिमित्त होणारे विविध धार्मिक ...

आषाढी एकादशीनिमित्त जयनगर येथील दत्त मंदिर बंद
जयनगर : सलग दुसऱ्या वर्षीही आषाढी एकादशीवर कोरोना महामारीचे सावट आहे. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमुळे आषाढी एकादशीनिमित्त होणारे विविध धार्मिक कार्यक्रम महाराष्ट्रात कुठेही साजरे झाले नव्हते. यावर्षीही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासन आदेशान्वये जयनगर येथील दत्त मंदिर आषाढी एकादशीला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहादा तालुक्यातील जयनगर येथील महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असलेल्या दत्तप्रभूंच्या मंदिरात यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील दत्त मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी येऊ नये, असे आवाहन दत्त मंदिराचे पुजारी दिवाकर बाबा यांनी केले आहे.
दत्त मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यासह मध्यप्रदेश येथील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत असतात. मात्र शासनाने कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता अजूनही धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी न उठवल्याने जयनगर येथील दत्त मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम शासन आदेशान्वये रद्द करण्यात आले आहेत. दरवर्षी येथील मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नसून, तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याने शासन आदेशान्वये मंदिर प्रशासनाकडून जयनगर येथील दत्त मंदिर २० जुलै रोजी बंद ठेवण्यात येणार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिराचे सेवेकरी दिवाकर बाबा यांनी केले आहे.