आसनबारीपाड्यात वीज पोहोचल्याने अंध:कार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:14 IST2020-07-12T12:14:26+5:302020-07-12T12:14:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुड्याच्या डोंगराळ भागातील चिखलीच्या आसनबारीपाडा, ता.अक्कलकुवा येथील युवकाच्या पाठपुराव्यामुळे व ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित ...

आसनबारीपाड्यात वीज पोहोचल्याने अंध:कार दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सातपुड्याच्या डोंगराळ भागातील चिखलीच्या आसनबारीपाडा, ता.अक्कलकुवा येथील युवकाच्या पाठपुराव्यामुळे व ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्याने या वृत्ताची दखल घेत डोंगर माथ्यावरील आसनबारीपाडाच्या पाड्यातील घरात कायमच असलेला अंधारअखेर वीज पोहचल्याने दूर झाला आहे.
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील मोगरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखलीच्या आसनबारीपाडा येथे विजेची सुविधा अभावी अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे येथील युवक सोन्या वसावे याने आपल्या डोंगर माथ्यावरील पाड्यांवरदेखील विजेचे लाईट चमकावे यासाठी वीज मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधून निवेदन देत पाठपुरावा सुरू केला. मात्र वीजपुरवठा काही सुरळीत होईना अखेर त्याने अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचे नियोजन केले.
यासंबंधी त्याने भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांची भेट घेत ठिय्या आंदोलन करण्याचे नियोजन सागिाले. त्यामुळे नागेश पाडवी यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विजेचे साहीत्य पोहचवून लगेचच कामाला सुरूवात होईल असें आश्वासन मिळाल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करीत आंदोलनाची वेळ येऊ दिली नाही.
त्यामुळे अधिकाऱ्यांनीही लागलीच कामाला सुरूवात केली. मात्रमध्येच कोरोना जागृत झाल्याने आसनबारीपाड्याच्या डोंगर माथ्यावर विजेचे पोल उभे राहून पोल वरून केबल ही टाकण्यात आली. तसेच रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू होईल तेवढ्यात लोकडाऊन जाहीर झाल्याने हे काम बंद पडले होते. त्यामुळे पुन्हा कामाला सुरूवात केव्हा होईल याची प्रतिक्षा आसनबारीपाडा वासीयाना लागली होती. यानंतर लोकडाऊनमध्ये सुट मिळाल्यानंतर पुन्हा लोकमतमधून वृत्त प्रकाशित केल्याने या कामासंदर्भात पाठपुरावा सुरू करून त्वरित या पोलवर रोहित्र जोडून अखेर डोंगर माथ्यावरील आसनबारीपाडा येथील घराघरात वीज पोहचवून अंधाºयातील या घरात प्रकाश आल्याने आसनबारीपाडावासीयांचा आनंद द्विगुणीत झाला.
या वेळी ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केल्यानी वीज मंडळाचे अधिकारी व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांचे चिखलीच्या आसनबारीपाडा येथील सोन्या मुंगा वसावे, चिमन बाज्या वसावे, दत्तु नोबल्या वसावे, मधुकर दामा वसावे, भिमसिग बापू वसावे यांच्यासह ग्रामस्थांनी आभार मानले.